Sandeep Ranade 'Naadrang'

Sandeep Ranade "Naadrang" is a Hindustani Classical Vocalist of the Mewati Gharana. His gurus include Padma Vibhushan Sangeet Martand Pandit Jasraj, Late Dr. Shobha Abhyankar and Mrs. Anjali Joglekar-Ponkshe.

Sandeep is a software engineer and has worked at companies like Google, VMware, Microsoft, etc. He has a Masters Degree in Computer Science from Johns Hopkins University.

 He creates rich soundscapes by pairing musical aesthetic with mathematical rigor, tradition with innovation. He frequently incorporates his experiences in life and music and has created over 70 compositions under the nom de plume 'Naadrang'. His creations span various Ragas, subjects, emotional situations and melodic structures like Bandish, Tarana, Chatrang, Trivat, Geet, Raagmala, Abhanga, Bhavgeet and Nirguni Bhajan. 

Sandeep won the All India Vedic Heritage Indian Classical Music contest in 2004 in New York, USA, where Padma Vibhushan Sangeet Martand Pandit Jasraj was one of the judges. Since then he's learnt with and accompanied Panditji in several concerts over the world, including Sawai Gandharva Bhimsen Festival.

Sandeep has studied the human voice, the art and science of practice, learning theory, etc. and has formulated 'NaadYoga' (yoga for the voice) - a riyaaz, customized for an individual's unique voice. NaadYoga employs combinatorial theory, optimization theory, coverage analysis, and other computer science and mathematical techniques to create a complete, powerful and effective riyaaz that takes about one tenth the time. He teaches NaadYoga and Hindustani Classical Music all over the world (USA, Canada, India, Europe, Australia).

Sandeep has created the NaadSadhana app to help students of Classical Music attain consistently perfect notes. 

संदीप रानडे "नादरंग"

श्री. संदीप रानडे “नादरंग” हे मेवाती घराण्याचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आहेत. त्यांनी पद्मविभूषण संगीतमार्तंड पंडित जसराजजी, कै. डॉ. शोभा अभ्यंकर आणि सौ. अंजली जोगळेकर पोंक्षे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. 

संदीप हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्यांनी अमेरिकेतील जॉन्स हॉपकीन्स युनिवर्सिटी मधून कॉंप्युटर सायन्स विभागात मास्टर्स डिग्री प्राप्त केली आहे. ते अमेरिकेत असताना गुगल, व्हीएमवेअर, मायक्रोसॉफ्ट अशा वेगवेगळ्या प्रथितयश कंपन्यामधे कार्यरत होते. 

संगीतशास्त्रातील सौंदर्य, बारकावे आणि गणितीशास्त्रातील सिद्धांत यांच्या अनोख्या मिलाफाची प्रचिती संदीप यांच्या गाण्यातून येते. नादरंग ह्या टोपणनावाने त्यांनी वेगवेगळ्या रागांवर, स्व:ताच्या आयुष्यातील अनुभवांवर आधारित अशा जवळजवळ ७० रचना केल्या आहेत त्यामधे विविध बंदिशी, तराणे, चतरंग, त्रिवट, गीत, रागमाला, अभंग, भावगीते, निर्गुणी भजन यांचा समावेश आहे. पारंपारिक तसेच नावीन्यपूर्ण आधुनिक संगीत यांचा सुरेख संगम संदीप यांच्या रचनांमधून झळकतो. 

संदीप यांनी अनेक वर्षं साधना आणि सखोल अभ्यास करून रियाजाची एक नाविन्यपूर्ण पद्धत विकसित केली आहे त्यानुसार दहा तासांचा रियाज एका तासामधे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करता येतो. या अविष्काराचे नाव "नादयोग" असून जगभरामधे विविध ठिकाणी जसे भारत, अमेरिका, कॅनडा, युरोप, अॉस्ट्रेलिया येथे संदीप हिंदुस्थानी शास्त्रीय गायन शिकवतात तसेच नादयोगाच्या कार्यशाळाही घेतात. 

शास्त्रीय संगीताच्या साधकांसाठी संदीप रानडे यांनी 'नादसाधना' हे अँप तयार केले आहे. रोजचा रियाज अँप वापरून केल्याने स्वर स्थाने पक्की व अचूक होण्यास मदत होईल. 

© Copyright 2018 Sandeep D. Ranade